Friday, February 19, 2016
ब्ल्यू बॉटल.
चकचकीत अँगल्ड सनबिम.
Saturday, February 06, 2016
भडक बॅरोनेट.
मांसाहारी एपफ्लाय.
Tuesday, September 29, 2015
फुलपाखरांची अंगत पंगत.....
Friday, October 08, 2010
आज जगात हॉक मॉथ या प्रकारच्या पतंगांच्या १२०० च्या आसपास जाती आढळतात. मध्यम ते मोठ्या आकाराच्या ह्या पतंगांचे मोठे डोके आणि बटबटीत डोळे प्रामुख्याने नजरेत भरतात. हे त्यांचे बटबटीत डोळे वेगवेगळे रंगसुद्धा ओळखू शकतात असे आता अभ्यासानंतर सिद्ध झाले आहे. यांचे पुढचे पंख

या हॉक मॉथ मधेही उड्डाणासाठी खास ओळखले जाणारे बी हॉक मॉथ किंवा हमिंगबर्ड हॉक मॉथ आपल्याला फक्त पावसाळ्यातच दिसतात. बी हॉक मॉथ किंवा हमिंगबर्ड हॉक मॉथ यासारखे पतंग फुलांवर मधाकरता झेपावताना तब्बल ३०० वेळा प्रतिसेकंद पंख हलवतात आणि हवेतल्या हवेतच, उडता उडता आपली लांब सोंड फुलांत खुपसून मध प्राशन करतात. त्यांची ही हालचाल एवढी जलद असते की आपल्याला उडताना त्यांचे फक्त शरीरच दिसते आणि पंखांची हालचाल जाणवून येत नाही. यातील बऱ्याचशा जातींचे पंख पार

या पतंगाची मादी त्यांच्या अन्नझाडाच्या पानाखाली एकेकटे अंडे घालते मात्र ती मादी एका हंगामात १००च्या आसपास अंडी घालते. हिरवट रंगाची ही अंडी जातीप्रमाणे ३ ते १० दिवसात उबून त्यातून अळी बाहेर येते. ह्या अळ्याही मोठ्या, जाडजूड असतात. ह्या अळ्यांना ओळखायची सोपी खुण म्हणजे त्यांच्या शरीराच्या शेवटच्या भागावर एक शेपटीसारखे शिंग असते. ही अळी दिसायला नितळ, गुळगुळीत पण जाडजूड आणि गुबगुबीत असते. ह्यांचे रंग अगदी उठावदार असतात. ह्यात प्रामुख्याने हिरवा, पिवळा रंग असतो. त्यांच्यावर पट्ट्या पट्टयांची किंवा डोळ्यांची नक्षी असते. ह्या डोळ्यांच्या किंवा पट्ट्यांच्या नक्षीमुळे त्यांचा अविर्भाव एखाद्या सापासारखा किंवा भयावह असा दिसतो. यात सुद्धा जर त्यांना डिवचले अथवा त्यांना धोका जाणवला तर त्या आपले डोके खाली घालून मान आणि शेपटीकडचा भाग उंचावतात. कोषावस्थेकरता त्या झाडाखाली उतरून पालापाचोळ्यामधे अथवा मातीमधे कोष करतात किंवा चक्क मातीच्या आत शिरून मातीचा घुमटाकार आकार बनवून आत कोष करतात.
या जलद उडणाऱ्या पतंगाचे हवेतल्या हवेत, उडतानाचे छायाचित्र मिळवणे तसे थोडेफार कठिणच काम असते. एकतर इतर पतंगांपेक्षा हे पतंग आकाराने एकदम लहान असतात आणि त्यांचे पंखसुद्धा रंगीत नसतात त्यामुळे ते जंगलात पटकन सापडत नाहीत. यांना शोधण्यासाठी आधी ज्या फुलांमधे मध जास्त आहे अशी झाडे शोधावी लागतात आणि त्या ठिकाणी चक्क त्यांची वाट बघत बसावे लागते. यावेळी आपल्याकडे कॅमेरा, फ्लॅश अशी साधने असा

युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com
फुलपाखरांच्या किंवा पतंगांच्या अळ्या ह्या तश्या निरूपद्रवी आणि अतिशय कमी हालचाल करणाऱ्या असतात. याच कारणांमुळे त्यांची पक्ष्यांकडून किंवा इतर भक्षकांकडून सहज शिकार केली जाते. यामुळे स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांची रंगसंगती आजूबाजूशी एकदम मिळतीजुळती होणारी असते यामुळे त्या आसपासच्या रंगात एकदम मिसळून जातात. त्याचबरोबर काही जातीच्या अळ्या असे अनाकर्षक रंग धारण करतात की पक्षी त्यांच्या कडे ढुंकूनसुद्धा बघत नाहित. याही पेक्षा काही जातीत तर त्यां

फुलपाखराचा जीवनक्रम हा वेगवेगळ्या शारीरिक अवस्थांचा असतो. प्रथम फुलपाखरे अंडी टाकतात, त्यानंतर त्यातून वळवळणारे कीडे बाहेर येतात. या वळवळणाऱ्या कीडयांनाच सुरवंट अथवा अळ्या म्हणतात. या एकाच अवस्थेमधे त्या प्रचंड प्रमाणात खाऊ शकतात आणि तेवढयाच प्रमाणात वाढू शकतात.

या अळ्या अंडयाच्या टोकाला एक बारीकसे छीद्र पाडून त्यातुन बाहेर येतात. अंडयातून बाहेर आल्यानंतर सर्वप्रथम ते त्या अंडयाची टरफले खाऊन टाकतात. या अंडयाच्या कवचांमुळे त्यांना सर्वाधिक प्रथिने मीळतात. ही एकमेव वाढायची शारीरिक अवस्था असल्यामुळे जेवढे खाणे खाता येइल तेवढे अळी खाऊन घेते. या अळीचा जबडा एखद्या कात्रीसारखा भरभर चालतो आणि ती पानामागुन पान आणि फांदीमागुन फांदी फस्त करत जाते. जशी जशी अळी वाढत जाते तशी तशी तिची कातडी लहान लहान होत जाते. मग ती कात टाकून नवीन कातडीसकट परत वाढू लागते. अळीच्या आयुष्यात ती एकंदर पाच वेळेला कात टाकते.
जरी अळ्या पाने खाउन जगत असल्या तरी प्रत्येक अळीचे स्वता:चे असे अन्नझाड ठरलेले असते. पानांमधील जी काही रासायनिक द्रव्ये असतात तीच या अळ्यांच्या शरीराला पोषक असतात. म्हणुन अळ्या आपल्या विशिष्टय अन्नझाडावर किंवा त्या उपजातीच्या अन्नझाडावरच जगु शकतात. या अळ्या एखादे वेळी उपाशी मरतील पण दुसऱ्या जातीच्या झाडाला तोंड लावत नाहीत. या करता फुलपाखराच्या मादीने आपल्या उपजत कौशल्याने अगदी बरोबर असलेल्या अन्नझाडावरच अंडी घातलेली असतात. कधीकधी तर ती एखाद्या निष्पर्ण झाडावरसुद्धा अंडी घालते. पण त्या मादीचा अंदाज एवढा बरोबर असतो की जोपर्यंत अंडयातून अळ्या बाहेर येतात तोपर्यंत झाडाला नवीन पालवी फुटलेली असते. या अळ्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडी आपल्याप्रमाणेच ठरलेल्या असतात. जातीप्रमाणे काही अळ्या अगदी कोवळी पाने खाणे पसंद करतात तर काही जातींच्या

या अशा वेगवेगळ्या अळ्यांना बघण्याचा उत्तम काळ म्हणजे पावसाळ्याचा. अर्थातच या वेळी जंगलात अनेक प्रकारच्या नवनवीन झाडांना पालवी आलेली असते आणि याचमुळे त्यावर अनेक प्रकारची फुलपाखरे आणि पतंग अंडी घालतात. कालांतराने त्यातून अशा चित्रविचीत्र आकाराच्या अळ्या बाहेर येतात. त्यामुळे यावेळी जर का जंगलात आपण फेरफटका मारला तर नक्कीच १०/१२ वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या आपल्याला दिसू शकतात. इतर अळ्या जरी सहज दिसत असल्या तरी या लॉबस्टर पतंगाच्या अळ्या दिसणे मात्र थोडे कठीणच काम असते. यांचा एकंदर अविर्भाव असा असतो की झाडावर काहीतरी सुक्या पानाचा कचराच पडला आहे असे वाटते. इथे छायाचित्रात मात्र त्यांचे एकदम जवळून छायाचित्र घेतल्यामुळे त्यांचा आकार, रंग अगदी व्यवस्थीत जाणवतो पण जंगलात मात्र लांबून त्यांन बघितले तर त्या अळ्या आहेत हे सांगूनही पटत नाही.
युवराज गुर्जर.
www.yuwarajgurjar.com
Tuesday, January 12, 2010
भगव्याची कमाल.
फुलपाखरे जरी विविध रंगी असली तरी त्यातील स्कीपर हा वर्ग साधारणत: मातकट रंगाच्या फुलपाखरांचा आहे. या वर्गातील फुलपाखरे सहसा राखाडी, तपकीरी रंगाचीच आढळतात. त्यातील फार कमी जातीत रंगीबेरंगी नक्षी, रंग आढळून येतात. या वर्गातील फुलपाखरांचा आकारही हा अगदीच लहान अथवा मध्यम आकाराचा असतो. यांच्या उलट स्वालोटेल जातीतील फुलपाखरे मात्र आकाराने अतिशय मोठी, रंगानेसुद्धा भरजरी, दिमाखदार असतात. ही फुलपाखरे नुसतीच रंगीबेरंगी नसुन काही तर चमकदार आणि झळाळणारीसुद्धा असतात. त्यामुळे अर्थातच आपल्या जंगलात अश्या दिमाखदार फुलपाखरांच्या मागे छायाचित्रणासाठी पळणारे बरेचजण असतात. मोठ्या आकारामुळे, रंगीबेरंगी उठावदार रंगांमुळे आणि भरदिवसा त्यांच्या उडण्याच्या सवयीमुळे ती सहज सापडता आणि त्यांचे छायाचित्रण सहज करता येते.
मी मात्र स्कीपर जातीतील "भगव्यांच्या" मागावर बरेच दिवस होतो. आता हे भगवे म्हणजे नेमके सांगायचे झाले तर "ऑरेंज टेल आउल" आणि "ऑरेंज आउलेट" ही दोन फुलपाखरे. ही फुलपाखरे अगदी पहाटे किंवा संध्याकाळी उशीरा कार्यरत असतात. त्यामुळे जंगलात दिवसा फिरताना यांचा वावर एकदम कमी आढळतो. त्याच प्रमाणे अतिशय जलद उडण्याकरता ही खास प्रसिद्धा आहेत. त्यात यांचे रंगसुद्धा असे आहेत की अगदी जवळून बघितल्यावरच त्यांच्या "भगव्या" रंगाची जाणीव होते. अन्यथा तशाच मळकट रंगाची असल्यामुळे ती सुसाट उडताना कळतसुद्धा नाहीत. मागे येऊरच्या जंगलात एकदा एका उंच झाडावर हे ऑरेंज आउलेट उडत होते. लांब पल्ल्याच्या लेन्सने जेमतेम त्याचे क छायाचित्र घेता आले पण त्यात फक्त हे ऑरेंज आउलेट आहे एवढेच ओळखता येत होते आणि त्या छायाचित्राला काहीच मजा नव्हती. दुसरे ऑरेंज टेल आऊल तर फक्त एकदाच दिसले पण सुसाट वेगाने ते झाडीत शीरले की पुढे पळत जाउन त्याचा पाठलाग करूनसुद्धा त्याचे मला एकही छायाचित्र मिळवता आले नाही. त्यानंतर पुढे कित्येक वर्षे ती मला आमच्या जंगलात सापडलीच नाहित, तर त्यांचे छायाचित्रण तर दूरच राहीले.
या नंतर बऱ्याच वर्षांनी मला परत एकदा नागलाच्या जंगलात ऑरेंज आउलेट दिसले आणि थोडेफार त्याचे छायाचित्रणसुद्धा झाले. मात्र फार कमी वेळ ते समोरच्या फुलातील मध पीत होते त्यामुळे ते लगेचच तीथून उडून गेले. आता यावर्षी मात्र फणसाडच्या अभयारण्यात या दोनही भगव्यांनी मला एकाच वेळेस दर्शन दिले. आदल्या दिवशी चिखल गाणीच्या पाठवठ्यावर एक जंगली झाड फुलले होते. त्यावर मध पिण्यासाठी ऑरेंज आउलेट बऱ्याच उंचावर बसले होते. त्यामुळे त्याचे छायाचित्रण काही शक्य झाले नाही. मात्र दुसऱ्याच दिवशी अगदी भल्या पहाटे सकाळी सहा, साडेसहाच्या सुमारास वनखात्याच्या रेस्ट हाउसच्या आवारातच मला एक फुलपाखराची चाहूल लागली. त्याच्या जलद उडण्याच्या पद्धतीवरून ते नक्कीच स्किपर होते. मी अंदाज केला की ते बहुतेक ऑरेंज टेल आउल असावे पण तेवढ्यात ते त्या भागातून गायब झाले. परत ५/१० मिनीटातच ते परत घराच्या भिंतीवर आले. माझा अंदाज बरोबर होता ते दुर्मिळ ऑरेंज टेल आउलच होते. आपल्या शरीरातून पोटाकडून पाणी भिंतीवर सोडून, तिथला भाग ओला करून मग त्यात आपली लांबलचक सोंड खुपसून ते क्षार शोषून घेत होते. आमची धावपळ उडाली, पहाटेची वेळ असल्यामुळे कॅमेरे तयार नव्हते. आम्ही पळत पळत जाउन तंबूतून कॅमेरे आणून त्याचे छायाचित्रण सुरू केले. त्याचे मनसोक्त छायाचित्रण करेपर्यंतच बाजुच्या खोलीच्या आसपास ऑरेंज आउलेटची हालचाल सुरू झाली. चुलीच्या आसपासच्या राखेवर ते आकर्षीत होत होत. मात्र ते भयंकर चपळ आणि चंचल होते. सरतेशेवटी ते एका लाकडाच्या फळीवर बसले आणि मग त्याचीसुद्धा छायाचित्रे घेण्यासाठी आमची धावपळ सुरू झाली. फणसाडमधील भल्यापहाटे अगदी अनपेक्षीत अशी ही दोन भगव्यांची एकत्र भेट मला कायम लक्षात राहील.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
मखमली मून मॉथ.
जगातल्या सर्व देखण्या पतंगांची यादी केली तर त्यात आपल्या भारतातल्या मून मॉथ याचा नंबर नक्कीच वराच वरती येईल. दिसायला अतिशय सुंदर असणारा हा पतंग भलामोठा म्हणजे अगदी ५ इंचांएवढा असतो. अतिशय तलम, मखमली पिस्ता रंगाचे हिरवट असे यांचे पंख असतात. त्या पंखांची वरची कडा गडद किरमीजी रंगाची असते तर खालच्या पंखांची टोके एखाद्या शेपटीसारखी लांब आणि वळलेली असतात. पंखांच्या मधे एक पारदर्शक खीडकीसारखे गोलाकार छिद्र भासते. ही नक्षी चंद्राच्या कलेसारखी दिसते म्हणूनच हा "मून" मॉथ. यांचे शरीर जाडजूड, केसाळ आणि पांढरेशुभ्र असते. पाय आणि तोंडाचा भाग गडद किरमीजी रंगाचा असतो. ह्यांच्या स्पृशासुद्धा मोठ्या, कंगव्यासारख्या आणि हिरव्या रंगाच्या असतात. पंखांवरची गुलबट, पिवळसर झाक एकदम मनोहारी भासते.
भारतात सर्वत्र हा पतंग दिसत असला तरी तो सहज मात्र नक्कीच दिसत नाही. पावसाळ्यात आणि पावसानंतरच्या काही दिवसात यांची दिसण्याची शक्यता असते. निशाचर असल्यामुळे हे रात्रीच कार्यरत असतात आणि बऱ्याच वेळेला दिव्यावर आकर्षित झालेले आढळतात. दिवसामात्र झाडांच्या पानामागे हे दडून शांत बसून रहातात. नरापेक्षा आकाराने मोठी असलेली मादी करवंदावर, जांभळाच्या झाडावर जोंधळ्याच्या दाण्याएवढी पांढरट अंडी घालते. या अंड्यांवर तपकीरी, काळसर ठिपके असतात. साधारणत: १२/१४ दिवसानंतर त्यातून हिरवट रंगाच्या अळ्या बाहेर येतात. अतिशय खादाड असणाऱ्या अळ्या ह्या प्रचंड वेगाने खातात आणि तेवढ्याच जबरदस्त वेगाने वाढतात. आजुबाजुची एकदोन पाने वळवून ते आत कोष तयार करतात.
फार पुर्वी फिल्म कॅमेराच्या जमान्यात याची छायाचित्रे मी येऊरच्या जंगलात काढली होती, पन नंतर मात्र मधली काही वर्षे यांनी मला दर्शन दिले नव्हते. या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील गोव्याच्या बटरफ्ल्याय मीटच्या वेळी मात्र याला प्रत्येक दिवशी बघायचा योग आला आणि त्यामुळे त्यांचे व्यवस्थीत छायाचित्रणसुद्धा करता आले. आम्ही गोव्याच्या तांबडी सुर्ला या भागातील जंगलात भटकत असताना आमच्या ग्रुपला एका ठिकाणी हा पतंग एका झाडामागे दडलेला सापडला. त्याचे छायाचित्रण झाल्यावर आम्ही पुढे निघालो. एका झऱ्याच्या काठावर आम्ही विश्रांती घेत होतो. समोरच "बेट"वर आलेल्या मलबार रेवन, क्रुझर, कॉमन जे यांचे छायाचित्रण सुरू होते. एवढ्यात कोणीतरी सांगल आला की तीथे एक पिवळसर, पांढरा वेगळाच दिसणारा किडा आहे आणि त्याने मला त्याच्या मोबाईलच्या कॅमेराने काढलेला त्याचे छायाचित्र दाखवले. मी चक्रावून गेलो, तो कुठलातरी किडा नसुन नुकतेच कोषातून बाहेर आलेले मून मॉथ होते. त्याचे पंखसुद्धा पुर्ण सुकले नव्हती आणि त्यांचा विस्तारसुद्धा झालेला नव्हता.
अर्थातच आम्ही पळत पळत त्या जागेवर पोहोचलो, जमिनीपासून जेमतेम एका फुटाच्या अंतरावर गवताच्या पात्यांच्या आधाराने ते मून मॉथ बसले होते. बाजुलाच त्याच्या , रीकामा, अर्धवट गुंडाळलेला कोष दिसत होता. एखाद्या कापसाच्या बोंडासारखे त्याचे पांढरेशुभ्र शरीर आणि त्यावर पिवळसर, गुलाबी, लाल कडा असलेले पंख अतिशय सुंदर दिसत होते. आम्ही सर्वांनी त्याची झटपट छायाचित्रे काढून घेतली आणि झऱ्यावर परतलो. दर १०/१५ मिनीटांनी मी परत परत त्याच्याकडे जाउन त्याचे निरिक्षण आणि छायाचित्रण करत होतो. त्याची प्रत्येक अवस्था ही अधिकाधिक मनमोहक होती. जवळपास दोन तासांच्या अंतराने त्याचे पंख पुर्ण प्रसरण पावले. तोपर्यंत आम्ही सर्वांनी त्याची शेकड्यानी छायाचित्रे घेतली होती. डोळ्यासमोर त्याचे पंख पुर्ण विस्तार होताना बघणे म्हणजे शब्दात व्यक्त न करण्यासारखे दृश्य होते. जमिनीवर एवढया खालच्या अंतरावर, एवढ्या उठावदार रंगाचा, एवढ्या मोठ्या आकाराचा पतंग असा सहज कसा बसला होता याचेच आम्हाला आश्चर्य वाटत होते. त्यानंतरच्या २/३ दिवसात आम्हाला खुप वेळा वेगवेगळे मून मॉथ दिसले. त्याच्या लालभडक पायांचे, त्याच्या कंगव्यासारख्या हिरव्या स्पृशांचे, त्याच्या वळलेल्या लांबलचक शेपटीचे, त्याच्या पंखांवरील चंद्राच्या कलेप्रमाणे असलेल्या नक्षीचे मी बरेच छायाचित्रण केले. पण अर्थातच त्याचे कोषातून बाहेर येणे आणि पंख विस्ताराचे दर्शन हे कधीही न विसरण्यासारखे दृश्य आहे.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
Friday, May 08, 2009
फेब्रुवारी, मार्च महिना आला की आपली जंगले सुनसान होऊन जातात. एकतर हा शाळा, कॉलेजचा परिक्षांचा हंगाम असल्यामुळे सगळे गपचुप घरात अभ्यास करत बसलेले असतात आणि जंगलात तशी लोकांची वर्दळ कमी झालेली असते. याचवेळेस जंगलात पानझड झाली असल्यामुळे सबंध जं

कान्हा, रणथंभोरच्या जंगलात कीतीतरी प्राणी, पक्षी दिसत असले तरी जशी आमची नजर वाघाला, बिबळ्याला शोधत असते तसेच काहीसे या चिखलपानाच्या वेळी "राजांचे" होते. चिखलपानाच्या वेळी सुक्या ओढ्यात, ओलसर चिखलावर स्पॉट स्वोर्डटेल, कॉमन गल, ईमीग्रंट, झेब्रा ब्लू, लाईन ब्लू, सेलर्स, प्लम जुडी, पॅन्सी अशी अनेल फुल

जंगलात जर का तुम्हाला यांना नैस

युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
ग्रास डेमन.
पावसाळ्यात ग्रास डेमन हे फुलपाखरू आपल्याला अगदी सहज दिसते आणि ते ओळखण्यासाठीसुद्धा खुप सोपे असते. याचा आकार मध्यम असून त्यांचा रंग काळा असतो आणि त्यावर पांढरे ठिपके असतात. ही ठिपक्यांची नक्षी पंखांच्या वर आणि खाली दोनही बाजूंना असते. यांचे नर आणि मादी सारखे दिसत असले तरी यांचा ड्राय सिझन फॉर्म (उन्हाळ्यातील रंगसंगती) थोडासा वेगळा दिसतो. यावेळी त्यांचे पंख थोडेसे पिवळसर असतात आणि त्यावर लालसर तपकिरी रंगाची छटासुद्धा असते. पावसाळ्यात ही फुलपाखरे जेंव्हा पानावर बसतात तेंव्हा ती थोडेसे पंख उघडून बसतात आणि सतत ते पंख असे काही हलवतात की त्यांच्या ठिपक्यांच्या मुळे ते पंख चक्राकार फिरत असल्याचा भास होतो. यासाठी ते त्यांचे खालचे पंख आधी हलवतात आणि ही क्रीया अर्धवट असतानाच वरचे पंखसुद्धा हलवायला सुरवात करतात. या त्यांच्या अजब आणि एकमेव वैशिष्ट्यामुळे त्यांना आपण जर एकदा बघितले तर ती आपण सहज ओळखू शकतो. आपल्या भारतात पंखांची अशी वैशीष्ट्यपुर्ण हालचाल करणारे हे एकमेव फुलपाखरू आहे.
हे फुलपाखरू सहज दिसणारे असले तरी यांची उडण्याची पद्धत जलद आणि वेडीवाकडी वळणे घेत जाणारी असते. त्यातून याचा रंग काळा, पांढरा असल्यामुळे झाडीतील दाट काळोखात ती बसली तर पटकन दिसत नाहीत. मात्र यांचा वावर रानहळद, पेव या झाडांच्या आसपास असतो. कारण या जातींवर या फुलपाखराच्या माद्या अंडी घालतात. अंडी घालण्यापुर्वी मादी बऱ्याच झाडांचे आधी परिक्षण करते आणि जेंव्हा तीला एखादे झाड योग्य वाटेल तेंव्हाच त्या झाडाच्या पानाखाली आपले पोट वळवून एक लालसर रंगाचे, गुळगुळीत, गोलाकार अंडे घालते. अंडयातून बाहेर आल्यावर अळी प्रथम अंडयाचे टरफल मटकावते आणि नंतर त्या झाडाच्या पानाची एक छोटीशी वळवून आपल्याकरता खोली बनवते. इतर फुलपाखरांच्या अळीप्रमाणे ही अळीसुद्धा खादाड असली तरी थोडीशी लाजाळू असते आणि आपला खाण्याचा प्रोग्राम फक्त रात्रीच उरकते. अळीनंतर कोषसुद्धा त्याच झाडावर होतो आणि त्याचा रंगसुद्धा अळीच्य रंगाशी मिळताजुळता असतो. कोषाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची लांबलचक सोंड. ही सोंड त्यांच्या पंखाच्यासुद्धा बाहेर आलेली असते. अर्थातच प्रौढ फुलपाख्रराची सोंडसुद्धा शरीराच्यामानाने फारच मोठी प्रगत झालेली असते. "स्कीपर" जातीतील हे फुलपाखरू असल्यामुळे त्यांना फुलांतील मध खुप प्रिय असतो आणि त्यातून या लांबलचक सोंडेमुळे त्यांना घंटेसारख्या किंवा खोलगट फुलांतील मधसुद्धा सहज पीता येतो. काही घंटेच्या आकाराच्या अतिखोल फुलातील मध पिण्यासाठी तर या फुलपाखराला आख्खे आत घुसावे लागते आणि याच कारणामुळे त्या फुलांचे परागीभवन शक्य होते जे इतर कुठलाच किटक करू शकत नाही.
सर्वसाधारणपणे नविन छायाचित्रकार फुलपाखरांच्या छायाचित्रणासाठी अलिप्त असतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे फुलपाखरे खुप चंचल आणि चपळ असतात आणि एका जागी कधीच बसत नाहीत आणी यामुळे त्यांचे छायाचित्रण शक्य होत नाही. मात्र हे काही पुर्ण खरे नाही कारण फुलपाखरे जरी चपळ असली तरी फुलांतील मध पिण्यासाठी ती बराच वेळ फुलांना भेटी देतात आणि जेव्हा ती विश्रांतीसाठी बसतात तेंव्हा सुद्धा त्यांचे छायाचित्रण सहज शक्य होते. अर्थात यासाठी जर का आपला फुलापाखरांचा थोडासा अभ्यास असेल आणि आपल्याला त्यांच्या सवयींबद्द्ल माहिती असेल तर खरोखरच आपल्याला त्यांची छान, आकर्षक छायाचित्रे मिळू शकतात. ही "डेमन" मंडळी स्किपर या फुलपाखरांच्या गटात येतात, हा गट जलद उडण्यासाठी प्रसिद्ध आहे पण त्याच वेळेस फुलांतील मध पिण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यामुळे या डेमन मधील ग्रास डेमन, रेस्ट्रीक्टेड डेमन आणि बॅंडेड डेमन ही मंडीळी फुलांवर हमखास भेट देतात. घाणेरी, सदाफुली या फुलांवर मध पिण्याकरता तर रानहळद, सोनटक्का यावर अंडी देण्यासाठी ही फुलपाखरे या झाडांच्या आजूबाजूस उडत असतात. त्यामुळे आपण जर का या फुलांच्या आसपास दबा धरून बसलो तर आपल्याला या प्रकारची अनेक छायाचित्रे अगदी कॉम्पॅक्ट कॅमेरानेही सहज मिळू शकतात.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
Thursday, March 05, 2009
मंकी पझल.
हे एक विचित्र नाव असलेले पण अतिशय छान दिसणारे छोटेसे फुलपाखरू आहे. कुसूमच्या झाडाच्या लालभडक कोवळ्या पानांवर हे आपल्याला मार्च / एप्रीलच्या महिन्यात बसलेले आढळते. हे फुलपाखरू सहसा जमिनीच्या आसपास उडते. पण असे असले तरीही त्याची उडण्याचे पद्धत अतिशय जलद असते आणि त्याच्या पिवळ्या, काळ्या रंगामुळे ते उडताना कळतसुद्धा नाही. बऱ्याच वेळेला सकाळच्या कोवळ्या उन्हात ते पानांवर पंख उघडून बसलेले आढळते. याचा आकार इतर "ब्लू" फुलपाखरांप्रमाणेच अतिशय लहान असतो. पंखांची वरची बाजू गडद तपकीरी असते आणि वरच्या बाजूला पांढरट / पिवळट २-३ ठिपके असतात. खालच्या पंखाच्या वरच्या बाजूला पिवळसर ठिपक्यांची किनार असते आणि ३ शेपट्या असतात. पंखाच्या खालच्या बाजूला मात्र असमान नक्षी असते. मुख्य रंग तपकीरी पिवळा असला तरी काळ्या पांढऱ्या रेषांची नक्षी त्यावर असते.
फुलपाखरांची "ब्लू" ही जात जगात संख्येने जवळपास सर्वात मोठी म्हणून मानली जाते. आज भारतातसुद्धा यांच्या ४५०हून अधीक उपजाती सापडतात. ही फुलपाखरे आकाराने छोटी असतात. सर्वसाधारणपणे यांच्या पंखांचा वरचा रंग नीळा किंवा जांभळा असतो म्हणून यांना "ब्लू" असे म्हणतात. यांच्यात नरांचे आणि माद्यांचे रंग वेगवेगळे असतात आणि नरांचे रंग अधीक गडद आणि झळाळणारे असतात. त्याचप्रमाणे हवामान आणि ऋतूंप्रमाणे यांचे रंग बदलतात किंवा कमी अधीक गडद होतात. बऱ्याच उपजातींचे नर हे कोवळ्या उन्हात आपले पंख उघडून बसलेले दिसतात. ही फुलपाखरे फुलांवर आकर्षीत होतात पण त्याच वेळेला काही उपजाती मेलेल्या प्राण्यांवर, त्यांच्या विष्ठेवर, झाडाच्या डिंकावर पण आकर्षीत होतात.
ही फुलपाखरे नाजूक, चिमुकली असली तरी त्यांना पण शत्रू असतात, आणि त्यांच्यापासून बचाव करायला त्यांच्याकडे काही खास युक्त्या आहेत. पहिली युक्ती म्हणजे त्यांच्या पंखांच्या टोकाला असणाया शेपट्या. या शेपट्या, त्या बाजूला असणारी ठिपक्यांची डोळ्यासारखी दिसणारी नक्षी यामुळे तो भाग एकदम डोक्यासारखा भासतो. ही फुलपाखरेसुद्धा बसताना या शेपट्या एकसारख्या हलवत रहातात यामुळे तो पंखाचा शेवटचा भाग त्याच्या डोक्यासारखा दिसतो आणि शेपट्या ह्या स्पृशांसारख्या वाटतात. यामुळे भक्षक खऱ्या डोक्याकडे हल्ला न करता ह्या खोट्या डोक्याकडे करतो आणि त्याच्या तोंडी फक्त पंखाचा काही भाग लागतो, आणि फुलपाखराचा जीव वाचतो. दुसरी युक्ती म्हणजे काही उपजातींच्या अळ्या ह्या मुंग्याबरोबर रहातात. या अळ्यांच्या शरीरावर एक गोड द्राव देणारी ग्रंथी असते. हा द्राव मुंग्यांना आकर्षीत करतो, म्हणून या मुंग्या ह्या अळ्यांना संपुर्ण संरक्षण देतात आणि त्याबदल्यात त्यांना या अळ्यांकडून हा गोड द्राव मिळतो. या प्रकारच्या सहजीवनामुळे दोनही कीटकांचा आपापसात फायदा होतो.
अतिशय दिमाखदार आणि देखण्या अश्या या फुलपाखराला जंगलात शोधता शोधता मात्र नाकी नऊ येतात. आकार एकदम लहान, जलद आणि वेडीवाकडी वळणे घेत उडण्याची सवय आणि निसर्गात लपणारे रंग यामुळे ते पटकन सापडत नाही. जरी सापडले तरी ते छायाचित्र काढायच्या आत इतक्या वेगाने तिकडून उडून जाते की आपण त्याल फक्त "कुठे गेले कुठे गेले" म्हणून शोधत रहातो. मला आतापर्यंत यांची अनेक छायाचित्रे मिळाली पण त्याचे पंख उघडलेल्या स्थितीत काही छायाचित्र मिळत नव्हते. जरा त्यांच्या जवळ गेलो की ते लगेच एकतर पंख बंद तरी करायचे किंवा अर्धे पंख मिटून घ्यायचे. मात्र जेंव्हा दिवाळीच्या दिवसात आंबोलीला गेलो असताना तिकडच्या जंगलात जरा आत गेल्यावर, थंडी जबरदस्त असल्यामुळे वन खात्याच्या नर्सरीमधे ही फुलपाखरे मोठया प्रमाणावर पंख उघडून दिसली. दोन वर्षापुर्वी तर नागलाच्या जंगलात फिरताना मला हे फुलपाखरू दिसले, त्याची उडण्याची पद्धत जरा वेगळी वाटत होती आणि ते त्याच्या अन्नझाडाच्या आसपास घोटाळत उडत होते. बहुतेक ती मादी असून ती अंडे घालायला योग्य ती जागा शोधतेय असा अंदाज मी बांधला आणि खरोखरच तीने आपले पोट वक्राकार करून एक / दोन अंडी त्या झाडाच्या लालचुटूक पानावर घातली. हे सगळे इतके काही क्षणार्धात झाले के काही कळायच्या आत ते फुलपाखरू तिकडून उडून गेले होते, अर्थात मी आणि माझा कॅमेरा तयार असल्यामुळे मला एकतरी छायाचित्र जरूर मिळाले.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
Tuesday, February 03, 2009
परोपजीवन.
परोपजीवन म्हटले की आपल्याला लगेच झाडांवरची बांडगुळे आठवतात. मात्र फुलपाखरासारख्या नाजूक आणि गोंडस किटकावरसुद्धा जगणारे बरेच परोपजीवी किटक आहेत. फुलपाखरांच्या अळ्या ह्या अशा परोपजीवी किटकांना पटकन बळी पडतात कारण त्यांची रचना ही परोपजीवी किटक वाढायला उपयोगी असते. एरवी यजमान आणि परोपजीवी प्राणी किंवा झाड दोघेही जगतात. मात्र फुलपाखरांच्या बाबतीत असे घडत नाही. त्यांच्यात यजमान अळी किंवा कोष हमखास मरतो आणि परोपजीवी किटक अगदी आनंदात आपली प्रजा वाढवतात. ह्या परोपजीवी माश्यांच्या यजमान अळ्या ठरलेल्या असतात. विशीष्ट्य जातीच्या अळ्यांवरच ते आपली अंडी अथवा कोष करतात. ब्रॅकोनिडी कुळातील माशी फुलपाखराच्या अळीला एक सूक्ष्म छिद्र पाडून त्यात अंडी घालतात. ही अंडी टाकायला त्यांच्याकडे तीक्ष्ण असा सुईसारखा अवयव त्यांच्या पोटाच्या टोकाशी असतो. ही अंडी आतल्या आत उबून आत अळीचे मांस अन्न म्हणून खायला सुरूवात करतात. प्रथम ते चरबी खातात, मग ते पचनसंस्था, मज्जासंस्था यांच्यावर हल्ला चढवतात. अशाप्रकारे ती फुलपाखराची अळी मरून जाते अथवा मलूल होते. यानंतर त्या अळ्या उरलेले मांस खातात आणि पुर्ण वाढ झाल्यावर तिथेच त्या अळीच्या मृत शरीरावर किंवा बाजूला सोनेरी किंवा पांढरे तांदळाच्या दाण्याएवढे कोष करतात. यथावकाश त्यातून त्या परोपजीवी माश्या बाहेर येतात.
टॅचनिडी कुळातील परोपजीवी माश्यासुद्धा काहीशी अशीच पद्धत वापरतात. पण जास्तीकरून त्या त्यांची अंडी अथवा अळ्या ह्या फुलपाखराच्या अळीच्या अन्नझाडावर टाकतात. मग या परोपजीवी अळ्या यजमान अळीला चिकटतात आणि स्वत:च तिच्या शरीरात शिरतात. माईटस जातीचे परोपजीवी किटक बाहेर राहून अळीच्या शरीरातील रस शोषून घेतात. कधी कधी कोषांनासुद्धा ह्या माश्या टोचून त्यात अंडी घालतात. ह्या परोपजीवी किटकांबरोबरच अळ्यांना इतरही रोग होऊ शकतात. बऱ्याचदा अळ्या मरगळलेल्या आणि सुरकुतलेल्या अवस्थेत टांगलेल्या दिसतात किंवा त्यांच्या शरीरातून एक चिकट द्राव आलेला दिसतो. असे होण्याची बरीच कारणे असू शकतात. एकाच झाडावर अळ्यांची जास्त गर्दी, अस्वच्छता, ओले खाणे अथवा उपासमार यामुळे असे रोग होतात. काही अळ्यांना व्हायरसमुळे किंवा बुरशीजन्य रोगसुद्धा होतात. ह्या सर्वांवर मात करूनही काही अळ्या यशस्वीपणे कोष करून मग त्यातून प्रौढ फुलपाखारू बाहेर येते आणि याच कारणासाठी मादीने जरूरीपेक्षा जास्त अंडी घातलेली असतात.
फुलपाखरांवर घडणाऱ्या या परोपजीवनाची छायाचित्रे निसर्गात क्वचीतच आणि नशीबाने मिळतात. सोबतच्या छायाचित्रात दिसणाऱ्या कॉमन नवाबच्या हिरव्या अळीच्या शरीरातून बाहेर येउन परोपजीवी माशीच्या पिवळसर अळ्या कापसासारख्या धाग्यांनी कोष विणत आहेत. त्यांनी एवढ्या सफाईने कॉमन नवाबच्या अळीचे शरीर खाल्ले होते की त्या तिचे शरीर फाडून बाहेर आल्यवरसुद्धा पुढे कित्येक वेळ ती अळी जिवंतच होती. असे होण्यासाठी या परोपजीवी अळ्यांचा जीवनक्रम एवढा जलद वाढतो की नवाबची अळी कोष करण्याच्या आधी त्यांना त्यांचा कोष करायचा असतो. त्यांचा कोषसुद्धा होतो तो नवाबच्या अळीच्या शरीराखालीच, बीचारी ती अळी मात्र त्यांच्या कोषावर मलूलपणे बसून रहाते. एकदा लिंबाच्या झाडावर लाईम जातीच्या फुलपाखराने कोष केला. काही दिवसानंतर कोष काहीसा काळपट झाला अर्थात दुसऱ्या दिवशी ते फुलपाखरू कोषातून बाहेर येण्याची ती लक्षणे होती. मी पहाटेपासून कोषावर लक्ष ठेवून बसलो होतो. मात्र कोषातून छानसे पिवळ्या, काळ्या रंगाचे फुलपाखरू बाहेर यायच्या ऐवजी अतिशय बारक्या काळ्या रंगाच्या माश्या एका छोट्या भोकातून बाहेर यायला लागल्या. त्या एका कोषातून २७ परोपजीवी माश्या त्या सकाळी बाहेर आल्या आणि मला मात्र फुलपाखराऐवजे त्या छोट्या माश्यांचीच बाहेर येतानाची अनेक छायाचित्रे मिळाली.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
Friday, January 09, 2009
एप्रिल, मे महिना आला की उन्हाची तलखी वाढायला लागते. आपल्या इकडच्या पानगळीच्या जंगलात जाताना दहावेळा विचार करावा लागतो कारण सर्वच मोठ्या झाडांची पाने गळून गेलेली असतात आणि लहानसहान खुरटी झुडपे, गवत पुर्ण वाळून गेलेले असते. पक्षिनिरिक्षणासाठी

बऱ्याच वेळेला नेहेमी जलद उडणारी फुलपाखरे यावेळी चिखलपान करताना आपल्याला अगदी शांत बसलेली आढळतात. याचबरोबर इतर वेळी न आढळणारी पण याच वेळेस दिसणारी स्पॉटेड स्वोर्डटेल, ब्लॅक ऍंगल अशी फुलपाखरे दिसतात. या सगळ्या फुलपाखरांबरोबर

गेल्या वर्षी आम्ही नेलेल्या "फ्रुट बेट" वर एक ब्लॅक राजा आकर्षित झाले आणि आम्हाला त्याची बरीच छायाचित्रे मिळाली. मात्र या वर्षी माहिम निसर्ग उद्यानात माझ्या नेल्सन नावाच्या मित्राला एका झाडावर ७ ब्लॅक राजा एकाच ठिकाणी टिपता आले. त्याचे ते छायाचित्र अप्रतिम होते पण लगोलग आम्ही येऊरला गेलो असताना आम्हाला

युवराज गुर्जर.
http://www.yuwarajgurjar.com/
Tuesday, January 06, 2009
फुलपाखराशी झटापट.
सगळे कोळी मांसाहारी असतात आणि बऱ्याच प्रकारचे किटक हे त्यांचे मुख्य भक्ष्य असते. पण वेळप्रसंगी ते इतर कोळी एवढेच नव्हे तर त्यांच्याच जातीतील अशक्त कोळ्यांवरसुद्धा ताव मारायला पुढेमागे बघत नाहीत. सर्वसाधारणपणे कोळी जरी असले लहानसहान भक्ष्य खात असले तरी काही जातीचे कोळी हे बेडूक, सरडे, उंदीर आणी लहान पक्ष्यांचीसुद्धा शिकार करतात. कोळ्यांचे तोंड हे फक्त द्रव पदार्थ पिण्याकरता खास बनलेले असते. भक्ष्याच्या शरीरातील सर्व जीवनरस हा त्याच्या खास मुखावयातून शोषला जातो. अर्थातच हा द्रव पदार्थ ते पीत असल्यामुळे त्यांना खास वेगळे असे पाणी अगदी कमी लागते. कोळी जरी खादाड असले तरी प्रसंगी मोठ्या काळाकरता ते सहज उपास सोसू शकतात. कोळी त्यांच्या धारदार आणि तिक्ष्ण सुळ्यांनी भक्ष्याच्या शरीरात विष पसरवतात आणि त्यांना बेशुद्ध करून मग त्यांच्यावर ताव मारतात.
जाळे विणणाऱ्या कोळ्यांमधे जेंव्हा जाळ्यात किटक सापडतो तेंव्हा कोळी आधी खात्री करू घेतो की ते त्याच्यासाठी योग्य खाद्य आहे की नाही. जर एखादी विषारी गांधीलमाशी सारखी माशी कोळ्याच्या जाळ्यात अडकली तर कोळी सावधपणे जाउन, तीच्यामधे योग्य अंतर ठेवून तीला जाळ्यातून हळूहळू सोडवण्याच्या प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला चविष्ट नसलेले किटक किंवा विषारी, अखाद्य फुलपाखरे जाळ्यार अडकतात तेंव्हासुद्धा त्यांना न चावता त्यांना हळूहळू जाळ्यातून सोडवण्याचा तो प्रयत्न करतो. यामुळे त्याचे उपयोगी रेषमाचे धागे आणि विष यांची बचत होते. खाण्याजोग्या फुलपाखरांना मात्र लगेचच दुसऱ्या प्रकारच्या जाळ्याने वेटोळे घातले जातात आणि नंतर सावकाश भुख लागल्यावर त्याच्यावर ताव मारला जातो.
कुठल्या जातीचा किटक जाळ्यात सापडला आहे याच्यावरूनसुद्धा त्याला कुठे आणि कसे चावे घ्यायचे हे ठरलेले असते. गांधीलमाशी असेल तर तीला डंख करणारा काटा पोटाला असतो, तिथे चावा घेतला जातो. मधमाशी असेल तर तीच्या तोंडाचा चावा घेतला जातो. लाथा मारणारा नाकतोडा असेल तर त्याच्या लांब पायाचा चावा आधी घेतला जातो. पण त्याच वेळेला जर पतंग किंवा घरमाशी असे निरूपद्रवी भक्ष्य असेल तर थेट त्याच्या धडाचा आधी चावा घेतला जातो. जाळे बनवणारे कोळी अश्या प्रकारे शिकार करतात पण फुलात लपून रहाणारा "क्रॅब स्पायडर" हे त्याच्या रंगामुळे आजूबाजूला मिसळून जातात आणि मग तीथे आकर्षित होणाऱ्या किटकावर हल्ला करतात. जमीनीवर रहाणारे कोळी धावत जाउन, उडी मारून इतर किटक, मुंग्या ह्यांना पकडून त्यांची शिकार करतात.
बऱ्याच वेळेला फुलपाखरांचे छायाचित्रण करताना त्यांच्यावर ताव मारणारे, त्यांची शिकार करणारे कोळी बघायला मिळतात. येऊरच्या जंगलात सुंदर, रंगीबेरंगी "कॉमन जझबेल" या फुलपाखराचे छायाचित्रण करत होतो. अचानक ते फुलपाखरू घाणेरीच्या झुडपात बांधलेल्या मोठ्या "जायंट वूड स्पायडर"च्या जाळ्यात अडकले. त्या कोळ्याची भलीमोठी मादी जाळ्यावर त्या फुलपाखराच्या धडपडीची स्पंदने जाणवून लगेचच धावून आली आणि काही सेकंदातच त्याला दुसऱ्या चिकट रेषमाच्या धाग्यांनी वेढून टाकले. फक्त काही सेकंद चाललेला हा शिकारीचा खेळ खरोखरच थरारक होता. दुसऱ्या छायाचित्रात दिसणारे "ग्लासी टायगर" जातीचे फुलपाखरू फुलावर आकर्षित झाले होते पण त्याची हालचाल थोडी वेगळी जाणवत होती. जवळ जाउन निरीक्षण केले तेंव्हा कळले की त्या फुलाच्य खाली "क्रॅब स्पायडर" लपला होता आणि त्याने त्या आकाराने बऱ्याच मोठ्या असलेल्या फुलपाखराला पकडले होते. काहे सेकंदातच त्या फुलपाख्रराच्या शरीरातील सर्व जीवनरस शोषून घेतला आणि फोलकटासारखे उरलेले त्याचे पंख खाली सोडून दिले.
युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
Monday, January 05, 2009
स्थलांतर म्हटले की आपल्याला पक्षी स्थलांतर लगेचच आठवते. आज जगात बरेच पक्षी, मोठे प्राणी, मासे स्थलांतर करतात पण अतिशय चिमुकली, नाजुकशी फुलपाखरेसुद्धा स्थलांतर करतात हे बऱ्याच जणांना कदाचित नवीन असेल. लहान आणि नाजुकसुद्धा असणारे हे किटक प्रचंड लां

पक्ष्यांमधे अथवा प्राण्यांमधे स्थलांतराचा अभ्यास करणे तसे सोपे असते कारण एकतर ते आकाराने मोठे असतात, त्यांचे आयुष्य जास्त असते आणि दरवर्षी नित्यतियमाने ते त्याच त्याच जागी परत येतात. पण फुलपाखरांचे आयुष्य कमी असते, जी पिढी दक्षिणेकडे स्थलांतर करून अंडी घालते ती तिथेच मरते. त्यांची पुढची पीढी परत उत्तरेकडे उडत येते. या स्थलांतराच्या उड्डाणाकरता ही फुलपाखरे सहसा एकाचे दिशेने दोन भौगोलीक भागात उडतात. सहसा ही उड्डाणे दिवसा आणि त्यातसुद्धा ज्या दिवशी सुर्यप्रकाश चांगला असेल त्या दिवशी होतात. या सुर्यप्रकाशामुळे त्यांना उडण्याकरता योग्य ती उर्जा मिळते. या स्थलांतराकरता फुलपाखरे एकत्र कशी जमतात, कुठल्या दिशेने उदायचे हे कसे ठरवतात आणि जाण्याच्यी ठिकाणी त्यांच्या अळ्यांना भरपुर अन्नझाडे उपलब्ध आहेत की नाही हे त्यांना कसे कळते याचे कोडे काही अजुन पर्यंत उलगडलेले नाही.
आपल्या भारतातसुद्धा दोन प्रकारचे फुलपाखरांचे स्थलांतर बघायला मिळते. पहिल्या प्रकारात एकाच जातीची हजारो फुलपाखरे एकाच दिशेने उडताना दिसतात. यामधे मिल्कवीड आणि व्हाईट्स जातीची फुलापाखरे जास्त असतात. हा उडण्याचा काळ किंवा हंगाम अनिश्चीत असतो. दुस

आज भारतात या फुलपाखरांच्या स्थलांतराच्या अभ्यास न झाल्यामुळे त्यांची काही ठोस दिशा, वेळ आणि काळ आपल्याला माहित नाही. त्यामुळे या स्थलांतरचे छायाचित्रण म्हणजे मोठे

युवराज गुर्जर.मोबाईल नं. ९८९२१-३८३३८
http://www.yuwarajgurjar.com/
Thursday, January 01, 2009
या कोषामागे दडलय काय ?
काही किटक त्यांच्या आयुष्यामधे संपुर्ण अवस्थांतर करतात. याचा अर्थ असा की त्यांच्या अयुष्यातील एकंदर जीवन अवस्थांमधली कुठलीही अवस्था दुसऱ्या अवस्थांसारखी नसते. या किटकांची लहान पिल्ले ही त्यांच्या पालकांपेक्षा आकाराने, रंगाने, रूपाने एकदम वेगळी दिसणारी असतात. फुलपाखरांच्या आणि पतंगांच्या बाबतीत असेच घडते. फुलपाखराची मादी अंडी घालते ती अंडी एकदम वेगवेगळ्या आकाराची, रंगाची असतात. त्यानंतर त्यातून बाहेर येणारी अळी ही तर वेगळेच रंग असलेली असते. ही अळी वाढता वाढता पाच वेळा कात टाकते आणि त्यानंतर तीचा वेगळ्याच आकाराचा, रंगाचा कोष होतो. हा कोष मात्र बिलकुल वाढत नाही आणि हालचालही करत नाही. काही दिवसानंतर या कोषातून एक सुंदर, नाजूक पण वेगळ्याच रंगाचे फुलपाखरू बाहेर येते.
असेच हे "टॉनी कोस्टर" फुलपाखरू नुकतेच कोषातून बाहेर येत आहे. याचा रंग त्याच्या काटेरी, लालसर तपकीरी अळीपेक्षा कीतीतरी वेगळा आहे. जरी याचे पंख पुर्ण उलगडलेले नाहीत, सुकलेले नाहीत तरी त्याचा रंग पिवळसर भगवा आहे आणि त्यावर पांढरे, काळे ठिपके आहेत हे स्पष्ट दिसत आहे. साधारणत: महिन्याभरापुर्वी हे एक अतिशय बारके पिवळसर अंड्याच्या स्वरूपात होते. त्यानंतर त्यातून अळी बाहेर आली आणि तीने तीच्या कवचावरच उच्च प्रतीच्या प्रथीनांकरता ताव मारला. या जातीची फुलपाखरे कृष्णकमळाच्या वेलीवर मोठ्या संख्येने अंडी घालतात. बऱ्याच वेळा त्यातून एकाच वेळेस अळ्या बाहेर येतात आणि त्याच पानावर काही काळ रहातात. या वेळेस त्या पानाचा वरचा नाजूक पापुद्रा खाउन ते दिवस काढतात. काही दिवसानंतर मात्र त्या स्वतंत्र, वेगळ्या होऊन नवीन पानावर जातात आणि एकट्या रहातात. ही लालसर काळपट दिसणारी अळी प्रचंड खादाड असते आणि अक्षरश: पानामागून पान आणि फांदीमागून फांदी संपवत जाते.
यांचा कोष मात्र दिसायला अतिशय सुंदर असतो. फांदीवर लटकणारा हा कोष जेमतेम पाउण इंचाएवढा लांब असतो. याचा रंग परत वेगळा आणि फिकट गुलबट, पांढरा असतो आणि त्यावर काळ्या रेघांची नक्षी असते. त्यावर भगवे बारीक ठिपकेसुद्धा असतात. अंदाजे ७/८ दिवस हा कोष वेलीवर उलटा लटकत असतो. ज्या दिवशी फुलपाखरू बाहेर येणार त्याच्या आदल्या दिवशी हा कोष काळपट होतो. त्याचे बाह्याआवरण पारदर्शक होते आणि आतल्या पंखांचा रंग, आणि अवयव स्पष्ट दिसू लागतात.
बदलापुरला मला ह्या फुलपाखराचा संपुर्ण जीवनक्रम एका दिवसात एकाच वेळेस अचानक दिसला. कृष्णकमळाच्या वेलीचा एक मोठा मांडव होता. तिथे एका ठिकाणी कोषातून नुकतेच फुलपाखरू बाहेर आले होते. नंतर आजूबाजूला बारकाईने बघीतले तर काही पानांवर पिवळसर अंड्यांचे पुंजकेच पुंजके मला दिसले. काही पानांवर अर्धी अंडी शाबूत होती तर अर्ध्या अंड्यातून अळ्या नुकत्याच वळवळत बाहेर आल्या होत्या. इतर काही पानांवर वेगवेगळ्या अवस्थांमधील अळ्या, वेगवेगळ्या आकारात होत्या. काही काही अळ्यांनी नुकतीच कात टाकलेली होती आणि त्यांचे चमकदार रंग आणि बाजूला जुनी कातही तशीच दिसत होती. पलीकडे एका फांदीवर ह्या जातीच्या फुलपाखरांची जोडी मिलनावस्थेमधे दिसली. मांडवाच्या खालच्या बाजूला एक मादी आपले पोट वळवून अंडी घालतानासुद्धा दिसत होती. एकाच दिवशी ह्या फुलपाखरांच्या सर्व अवस्था आणि जिवनक्रम एकाच ठिकाणी दिसणे म्हणजे खरोखरच नवलाची गोष्ट होती.
नंतर यातला कोष घरी आणून त्यातून फुलपाखरू बाहेर येतानाचे छायाचित्रण करायाला दिवाळीच्या दिवशी अक्षरश: पहाटे पाचला उठून बसलो. अंदाजे सव्वा सातच्या सुमारास हलकेच तो कोष फाटून ते फुलपाखरू बाहेर आले आणि त्याने पंखांची उघडमीट केली. त्यावेळेस ते पंख ओले आणि आक्रसलेले होते. ज्या क्षणाची मी दोन अडीच तास वाट बघीतली ते फुलपाखरू बाहेर येणे मात्र काही सेकंदातच पार पडले आणि जेमतेम काही छायाचित्रे मिळाली. अर्थातच एका स्थीर कोषातून ते चळवळे फुलपाखरू बाहेर येताना बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव मला आणि माझ्या कॅमेरालाही होता.
युवराज गुर्जर.